मुख्याध्यापक जी.एम . पालव यांचा रविवारी सेवानिवृत्ती कार्यक्रम
कोल्हापूर न्यूज अणदूर / प्रतिनिधी - रघुनाथ दळवी
धुंदवडे ता.गगनबावडा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जी.एम . पालव
हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी
महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री ना.सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
धुंदवडे व शेळोशी ग्रामस्थांच्यावतीने ना. पाटील साहेबांच्या शुभहस्ते मुख्याध्यापक जी एम .पालव गुरुजींचा सहपत्नीक विशेष सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या जीवनावर आधारित विलास पाटील व संभाजी पाटील लिखित 'दीपस्तंभ'पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भगवान पाटील , गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सभापती सौ.संगीता पाटील ,उपसभापती पांडुरंग भोसले, माजी सभापती सौ. मंगल कांबळे गगनबावडयाचे तहसीलदार डॉ. सगंमेश कोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.रणजीत पाटील, गटविकास अधिकारी माधुरी परीट, धामणी खोऱ्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सदस्य , ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थी, उपस्थित असणार आहेत.
