धुंदवडे शाळेजवळील विद्युत ट्रान्सफरस् हटवण्याची ग्रामस्थांकडून मागणी

Kolhapur news
By -
धुंदवडे शाळेजवळील विद्युत ट्रान्सफरस्  हटवण्याची ग्रामस्थांकडून मागणी

कोल्हापूर न्यूज  /गगनबावडा प्रतिनिधी
  रघुनाथ दळवी

धुंदवडे गावास विद्युत पुरवठा करणारा विद्युत ट्रान्सफरस्  शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनला आहे.
मुख्य रस्त्याला लागून असलेला हा विद्युत ट्रान्सफरस् शाळेच्या आवारात येत असल्यामुळे दररोज 200 ते 250 विद्यार्थी या आवारामध्ये खेळत असतात. मुख्य विद्युत वाहिनी
 शाळेजवळूनच गेली असल्यामुळे काही वेळा दुर्घटनाही घडल्या आहेत. या अगोदर विद्युत ट्रान्सफरस् हटविण्यासाठी  विद्युत मंडळास निवेदनही देण्यात आले होते.
यामुळे प्रशासनाने गांभीर्याने याची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास असलेला धोका ओळखून शाळेत उन्हाळी सुट्टी आहे तोपर्यंत हा विद्युत ट्रान्सफरस् हटवावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.


धुंदवडे गावास विद्युत पुरवठा करणारा धोकादायक स्थितीतील विद्युत ट्रान्सफरस्