कोल्हापूर न्यूज / गगनबावडा प्रतिनिधी - रघुनाथ दळवी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक - शिक्षक यांच्यातील समन्वय महत्त्वपूर्ण आहे. शाळेच्या विकासाची भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास नक्कीच सुजाण नागरिक घडतील असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्रा.दिलीप पाटील यांनी व्यक्त केले. ते धुंदवडे ता गगनबावडा येथील प्राथमिक शाळेत
विद्यार्थी गुणगौरव, शिक्षक सदिच्छा समारंभ, व ग्रामपंचायत आभार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.अध्यक्ष माजी मुख्याध्यापक गणपती
पालव होते.
यावेळी मुख्याध्यापक बाळकृष्ण
जाधव यांनी प्रास्ताविकातून शाळेचा गुणवत्ता आलेख मांडला. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एम.जी पाटील, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील , नूतन उपसरपंच बाजीराव पाटील व इतर ग्रामस्थांनी शाळेच्या भौतिक सुविधा साठी लाखो रुपयेचा निधी उपलब्ध केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. शाळेचे माजी अध्यापक अमोल कांबळे यांनी शाळेसाठी दिलेल्या अनमोल योगदानामुळे त्यांना सदिच्छा देण्यात आल्या. प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा आयटीएस परीक्षेमध्ये शाळेचा नावलौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रंगराव पाटील, विलास पाटील, तानाजी कांबळे, प्रदीप कांबळे , श्रीपती तेली , सागर पाटील , संतोष पाच्छापुरे , राजेंद्र कागले , दिपक भोसले , संभाजी पाटील , रघुनाथ दळवी
शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन संतोष
पाच्छापुरे यांनी केले, तर आभार दीपक भोसले यांनी मानले.
धुंदवडे ता गगनबावडा येथे विद्यार्थी गुणगौरव प्रसंगी
नवोदयसाठी निवड झाल्याबद्दल विद्यार्थीनी कु . श्रेया चौधरी हिचा सत्कार करताना मान्यवर .
