गगनबावडा तालुका शासकीय व निमशासकीय सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

Kolhapur news
By -


गगनबावडा / प्रतिनिधी - रघुनाथ दळवी

गगनबावडा तालुका शासकीय व निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रकिया  या संस्थेच्या सन 2021-2022 ते 2026-2027 या करीता  निवडणूक बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णयधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक अनिता शिंदे यांनी काम पाहिले .

त्यासाठी संस्थेचे संस्थापक  निलेश  म्हाळुंगेकर , चेअरमन  एकनाथ वरेकर, संचालक सुभाष भोसले, संखाराम भालेकर, दशरथ गावडे, सुजित खोराटे यांनी प्रयत्न केले. 
नूतन बिनविरोध
संचालकपदाची नियुक्ती देऊन पत्रे देऊन निवडणूक निर्णयधिकारी सौ . अनिता शिंदे यांनी घोषित केले .

 संस्थेचे नुतन संचालक खालील प्रमाणे 
1.  निलेश निवृत्ती म्हाळुंगेकर 
2.  एकनाथ प्रल्हाद वरेकर 
3.  सुजित प्रकाश खोराटे 
4.  सुभाष आप्पासाहेब भोसले
5.  सुहास वासुदेव घाटगे 
6.  उदय राजाराम पानारी 
7 हिरोजी बळवंत गुरव 
8. दशरथ भागोजी गावडे 
9. शिवाजी पांडुरंग शिंदे
10.  शिवाजी देवबा पाटील 
11.  शौकत रमजान महात 
12.सौ. सरिता प्रकाश पाटील 
13. सौ. वंदना विठृठल कांबळे
14. सौ. उज्वला बापू बोरये 
तसेच संस्थेचे नुतन चेअरमन पदी सुजित प्रकाश खोराटे 
व व्हा. चेअरमन पदी शिवाजी पांडुरंग शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार संस्थापक
 निलेश म्हाळुंगेकर यांनी मानले .

साळवण येथे गगनबावडा तालुका शासकीय व निमशासकीय पतसंस्थेच्या  बिनविरोध संचालकपदी निवड झाल्याबद्दल हिरोजी गुरव यांचा सत्कार करताना
 मान्यवर .