कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आम्ही राजकारणात कोणावार विनाकारण पलटवार केले नाहीत. आणि कोणापुढेही गुडघेदेखील टेकले नाहीत. आम्ही शाहू महाराजांना पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय ठाम असून शाहू महाराजांच्या विजयासाठी मी व माझे कार्यकर्ते जिवाचे रान करतील.
मला सेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड प्रयत्न केले, पंरतू पक्षप्रमुख ठाकरे यांनी छत्रपतींच्या गादीचा मान राखण्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडली, त्यामुळे त्याची खंत नाही. निष्ठावंत कार्यकर्तेच आमचे भागभांडवल आहेत. त्यामुळे नेटाने कामाला लागू असेही संजयबाबा म्हणाले.
गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, आमचा राजकिय शत्रू कोण हे आता जवळजवळ ठरलेलं आहे. त्यामुळे ठाकरेंचा आदेश प्रमाण मानून आम्ही शाहू महाराजांच्याच पाठीशी राहू. जिल्हाचा खासदार ठरविण्याची ताकद संजयबाबा घाटगे गटात आहे. ती ताकद या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ.
यावेळी विजय जाधव, वैभव आडके, आनंदा भिऊंगडे, दिलीप चौगले, बाबूराव शेवाळे, विलास पाटील, संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, युवराज कोईगडे, अशोक पाटील, मुकुंद बोडके, मल्हारी पाटील, के. के. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास दिनकर पाटील, आनंदा साठे, ए. वाय पाटील, रणजित मुडूकशिवाले, सिद्रम गंगाधरे , एम.बी. पाटील, धनाजी गोधडे, विलास पोवार, शिवगोंडा पाटील, आल्लाबक्ष शहाणेदिवाण, संभाजी भोसले, राजू भराडे, अनिल देसाई, सुभाष कांबळे, शिवाजी शेळके, रामदास किल्लेदार, एस.टी.पाटील, सुनिल पाटील यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.स्वागत नानासो कांबळे यांनी केले आभार रमेश जाधव यांनी मानले.

