कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून तयारी करत असलेले गोकुळचे संचालक डॉ. चेतन अरुण नरके यांनी आज पत्रकार परिषद घेत मी कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर लोकसभा लढणार असल्याचे सांगितले. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून हातकणंगले लोकसभा मतदार संघातून लढण्यासाठी ऑफर देण्यात आली होती त्यासंदर्भात संजय राऊत यांना आपण हातकणंगलेमधून निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली .

