कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड नगर परिषदे समोरील शिवतीर्थ परिसर म्हणजे शहराचे दर्शनी सौंदर्य आहे. लग्नात नटलेल्या नवरदेवाला आरसा दाखवला जातो.सर्व कांहीं जिथल्या तिथे असेल तर स्वारी खुश.कारण सगळ्या वऱ्हाडींची नजर नवरदेव आणि वधुवर अधिक असते.
नगरपरिषदे समोरील शिवतीर्थ परिसराचे वर्णन असेच कांहीसे करावे लागेल. शिवतीर्थावर दिमाखाने मिरवणारा
'I ❤️ MURGUD '
हा फलक तर येणा जाणाऱ्यांना कांहीं क्षण थबकायला लावतो.
हे सौंदर्य अधिक वृद्धिंगत करण्याकरता कांहीं शिवभक्त व रसिक नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेला एक निवेदन नुकतेच दिले आहे.
शिवतीर्थावर मागील व नगरपरिषद इमारतीच्या बाजूस आकर्षक फाटक असले पाहिजे.प्रवेश द्वारावर लाकडी उंबरा असावा.शिवरायांच्या पुतळ्याला रंग देवून त्यावर प्रकाश झोत सोडावा .सद्या पुतळा रात्री तितका स्पष्ट दिसत नाही.समोरील गणेश मंदिरा च्या बाजूस तटबंदी असावी.नैसर्गिक हिरवळीची नित्य देखभाल व्हावी .शहरातील एक देखणे पर्यटन क्षेत्र म्हणून शिवतीर्थाचे सुशोभिकरण व्हावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .निवेदनावर पुढील कांहीं शिवभक्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सर्जेराव भाट,पृथ्वीराज भुते, ओंकार पोतदार,रणजित मोरबाळे,धीरज गोधडे,अभी मिटके,संकेत शहा ,रोहित मोरबाळे,विशाल मंडलिक इत्यादी.


