कुरणीचे सर्पमित्र रघुनाथ बोडके यांनी पकडला अती विषारी किंग कोब्रा नाग

Kolhapur news
By -

          

            



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क

      

    भडगाव ता.कागल येथील शामराव पाटील यांच्या गोठ्यात या नागराजाने ठाण मांडले होते.हा नाग किंग कोब्रा प्रकारचा असल्याचे समजताच सर्वांची पाचावर धारण बसली.

  कुरणी ता .कागल येथील सर्पमित्र रघुनाथ बोडके यांना पाचारण करण्यात आले.त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या जातीचे साडेचार हजार साप आता पर्यंत पकडले आहेत.

    या ही अतीविषारी नागास त्यांनी शिताफीने पकडले व त्याच्या अधिवासात नेऊन सोडले.

    बोडके हे स्वतः सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असून सामाजिक सेवा म्हणून कित्येक वर्षे साप पकडण्याचे काम करत आहेत.