कोलकाता संघ 10 वर्षांनंतर IPL चा चॅम्पियन ठरला

Kolhapur news
By -

             

       



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    कोलकाता नाईट रायडर्सने IPL-2024 चे विजेतेपद पटकावले आहे. संघाने अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. कोलकाता संघ तिसऱ्यांदा या लीगमध्ये चॅम्पियन बनला आहे. या संघाने तब्बल 10 वर्षांनंतर विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वेळी कोलकाता 2014 मध्ये चॅम्पियन झाला होता.


रविवारी चेपॉक मैदानावर हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 18.3 षटकांत सर्वबाद 113 धावा केल्या. कोलकाताने 114 धावांचे लक्ष्य 10.3 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. व्यंकटेश अय्यरने 26 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी केली. रहमानउल्ला गुरबाजने 32 चेंडूत 39 धावा केल्या. आंद्रे रसेलने गोलंदाजीत 3 बळी घेतले.