नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी केली - शरद पवार

Kolhapur news
By -

 

        






    

                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे माझा आत्मा अस्वस्थ आहे, हे खरे आहे. कारण या आत्म्याने अगदी कमी वयात जवाहरलाल नेहरू सुद्धा लांबून पाहिलेत ,इंदिरा गांधी जवळून पाहिल्यात. इंदिरा गांधींपासून आतापर्यंतच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक पंतप्रधानांशी कुठे न कुठे भेटण्याची , बोलण्याची संधी मिळाली. त्यांची भाषणे ऐकायची संधी मिळाली, पण पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा जे आता करताहेत, ती यापूर्वी कधीही झाली नाही  अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली . 


पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की त्यांना दोन लोकांची आठवण होते. एक उद्धव ठाकरे दुसरे शरद पवार. आम्हा दोघांवर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. तुम्ही महाराष्ट्रात कितीही आलात, कितीही टीका केलीत तरीही जेव्हा संधी मिळेल तेव्हा महाराष्ट्र तुम्हाला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमची ती तयारी आहे." असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट इशारा दिला  . 

   

   कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आज गांधी शिव शाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरेंसह काँग्रेसमधील बडे नेतेही कोल्हापुरात उपस्थित होते. मोदींनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात सभा घेतली. त्यानंतर, आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन शाहू महाराजांना निवडून  देण्याचे आवाहन केले . 

      

 सतेज पाटील म्हणाले, आम्ही टी-20 खेळत असून आता शेवटच्या ओव्हर बाकी आहेत, आपला स्कोअर चांगला झाला आहे. आता राहिलेल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी. फुले, शाहू आंबेडकरांचा आवाज धुमधडाक्यात पोहोचला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र कोल्हापूरकडे पाहत आहे.