कोल्हापूर न्यूज / वि .रा .भोसले
शासनाच्या नवीन अभ्यासक्रमात "मनुस्मृति" चा समावेश अशी बातमी वृत्तपत्रात आली आणि साप दिसावा तसे सगळेच दचकले.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून कडवट प्रतिक्रिया यायला सुरुवात व्हायच्या आधीच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खुलासा केला.
ड्राफ्ट मध्ये चुकून मनुस्मृति चा उल्लेख झाला आहे व त्याचा अभ्यासक्रमात समावेश असणार नाही.
चुक झाली आणि ती दुरुस्त केली हे ठीक झाले .तोपर्यंत राजकीय विरोधकांनी त्याचा लाभ उठवायचा प्रयत्न केलाच.
असो,मनुस्मृतिचा इतिहास जाणून घेऊ.
सुमारे दहा हजार वर्षापूर्वी तिचा वैदिक ग्रंथात जन्म झाला असावा.त्यामध्ये तत्कालीन समाजरचना वर्णिली होती.त्यात चार वर्ण होते.त्यापैकी दलितांना त्यात गौण स्थान दिले होते.स्त्रियांना सुध्दा गौण स्थान होते.
या मनुस्मृति चे २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड जवळच्या चवदार तळ्याकाठी दहन केले होते.त्याला म.गांधींनी विरोध केला होता.
त्यानंतर २६ जानेवारी १९४९ ला भारतीय राज्य घटना (संविधान) राष्ट्राला अर्पण झाली.
या घटनेत चातूर्वण्य आणि मनुस्मृति यांना तिलांजली देण्यात आली आहे.देशात सुध्दा बंदी आहे.
मग हा उल्लेख अचानक आला कोठून ?
ते ही पाहूया.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT :State council of educational research and training) ही एक स्वायत्त संस्था आहे. ती अभ्यासक्रम तयार करते.त्यात कांहीं अती शहाणे सुध्दा बसलेले असतात.त्यांना राष्ट्रीय धोरणाचे ज्ञान नसावे हे दुर्दैव आहे.
राजकारणाचे तवे तापायला ते एक निमित्त झाले.
मनुस्मृति मध्ये स्त्रियांच्या संरक्षण विषयक एक श्लोक आहे.
पिता रक्षती कौमारे
भर्ता रक्षती यौवने
रक्षंती स्थाविरे पुत्रा
न स्त्री स्वातंत्र्य अर्हता .
स्त्रीचे कौमार्य अवस्थेत पित्याने ,यौवनात पतीने व नंतर पुत्राने रक्षण करावे व स्त्रीला एकटे किंवा स्वतंत्र सोडू नये असा या श्लोकाचा अर्थ आहे.
देशातील सद्य स्थिती पहाता लव्ह जिहाद आणि स्त्री सुखाला वखवखलेल्या अधमांच्या मुळे स्त्री सुरक्षित नाही ही वस्तुस्थिती आहे.
स्त्रियांना सन्मान देणे ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे.या देशालाच आपण भारतमाता मानतो.
नवदुर्गा सारख्या आदिशक्तीचे महात्म्य स्त्री ला आपणच बहाल केले आहे. जिजाऊ माँ साहेब, झाशीची राणी, राणी चंन्नम्मा, महाराणी ताराबाई , पुण्यश्लोक अहिल्याबाई, सावित्री बाई फुले या स्त्रिया आपली प्रेरणास्थाने असून त्यांना अभ्यासक्रमात आधीच स्थान दिलेले आहे.
देशालाच माता मानण्याऱ्या अभ्यासक्रमासाठी "मनुस्मृति" चे मढे उकरून काढण्याची गरज नव्हती.
अभ्यासक्रम रचनेत संविधान आणि राष्ट्रीय धोरण यांचे तारतम्य असणारी माणसे बसवावीत हीच अपेक्षा.
जय भारत.



