कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आम्ही शाहूंच्या विचारांचा वारसा जपतोय असे प्रतिपादन श्री. शाहू छत्रपती महाराज यांनी केले . लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन प्रसंगी ते बोलत होते .
दसरा चौक परिसरातील श्री शाहू समाधी स्थळ येथे श्री. शाहू छत्रपती महाराज, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील ,मालोजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांनी अभिवादन केले .
आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची तांदळाची रांगोळी याठिकाणी साकारण्यात आली होती.
विजय देवणे, व्ही. बी. पाटील, वसंतराव मुळीक, आर.के. पोवार, सतीशचंद्र कांबळे, गणी आजरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


