कोल्हापूर न्यूज / वि. रा. भाेसले
सहा जून शिवरायांचा राज्याभिषेक दिन. हजारो शिवभक्त रायगड चढून जातात. औपचारिक पणे सोहळा साजरा करतात.घोषणा देतात आणि गड अस्वच्छ करून परततात .
तेथे ना सिंहासन ना राजा.
मग कशासाठी हा देखावा
लाखो शिवभक्तांच्या हृदय सिंहासनावर शिवछत्रपती विराजमान आहेत.या शिवभक्तांनी ठरवले आहे की रयतेची सेवा करूनच शिवरायांना राज्याभिषेकाची सलामी द्यायची.
मुरगूडच्या शिवभक्तांनी असाच मनोदय व्यक्त केला आहे.
शहराची स्वच्छता करून शिवरायांना ६ जुनची सलामी द्यायची.
मान्सून याच दरम्यान येणार आहे.पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे.सर पिराजी तलावातून शहराला पाणी पुरविले जाते.पाण्याची पातळी खालावली आहे. जांभूळ खोऱ्यातून येणारा ओढा तलावाला मिळतो. खोऱ्या तील डोंगर कपारीतून येणारे ओघळ या ओढ्याला मिळतात आणि ओढा तलावाला पाणी पुरवतो.
नेमका हाच ओढा तुंबालाय.मातीने नव्हे घाणीने .
भंगारात गेलेल्या गाड्यांचे पार्ट,दारू आणि बियारच्या बाटल्या , फाटलेली कपडे, वाकळा आणि असे बरेच कांहीं यांनी ओढा तुंबला आहे.
या तुंबलेल्या ओढ्याची आणि तलाव परिसराची स्वच्छता करून पहिली सलामी देण्याचा निर्धार शिवभक्तांनी केला.
समाज सेवेत नेहमीच आघाडीवर असलेले सर्जेराव भाट व ओंकार पोतदार यांनी आधी स्वतः च सुरुवात केली.नगर पालिकेचे स्वच्छता मुकादम देखील त्यांच्या मदतीला धावले.लोकांनी त्यांच्या औचित्याचे मन भरून कौतुक केले.
मान्सून कमरेवर हात ठेऊन शेजारी उभा असताना तलावाची आणि ओढयाची स्वच्छता अत्यंत गरजेची होती.
सारं शहर या तलवाचे पाणी पिते.रयत शेतीला पाजते .
राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर शिव छत्रपतींना हीच खरी सलामी.
ही नुसती सलामी नाही तर नुसत्या पोकळ घोषणा देऊन दारू आणि गांजाच्या पार्ट्या करणाऱ्या करणाऱ्या नतदृष्टांना लागलेली चपराक आहे.
मुकादम बबन बारदेस्कर यांनी यांनी ही या शिवभक्तांना प्रोत्साहन दिले,मदत ही केली.
शिवभक्तीचा असा आदर्श विरळाच असतो.

