कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गलगले विद्यामंदिरच्या चार खोल्यांची दुरावस्था झाल्यामुळे शाळेच्या वतीने ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते. शाळेच्या या आवाहनास प्रतिसाद देत लोकवर्गणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या लोकवर्गणीतून आता शाळेच्या छप्पर दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे . शाळेच्या उर्वरित कामासाठी लोकवर्गणीचे आवाहन करण्यात आले आहे.
लोक वर्गणीतून सुरू असलेल्या या कामासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे . बहुतांश काम पूर्णत्वास गेले असून काही दिवसातच हे काम पूर्ण झाल्यानंतर अध्यापनाचे काम या वर्गामधून पूर्ववत सुरू होईल .
दरम्यान, ग्रामस्थ व गावातील तरुण मंडळाच्या वतीने शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली , त्यामुळे शाळेचा परिसर चकाचक झाला असून शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे.


