कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
मनोज जरांगे गेले वर्षभर आंदोलनात आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून ते लढत आहेत.महाराष्ट्र शासनाने अलीकडे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी १०% आरक्षण दिले आहे.याशिवाय ओबीसी नोंदी असलेल्या मराठ्यांना सुध्दा विविध अभ्यासक्रमांना प्रवेश ,शिष्यवृत्त्या , शैक्षणिक कर्जे यामधून सवलती मिळणार आहेत.
मराठा समाज महाराष्ट्रात ४५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.म्हणजेच बहुसंख्य आहे.आरक्षण हे आर्थिक मागास व अल्पसंख्यांकांना घटने प्रमाणे मिळाले आहे. मराठ्यांना सुध्दा जितके देता येईल तितके व कोर्टात सुध्दा टिकू शकेल इतके दिलेले आहे.
उच्च कुळीचा म्हणून जो कांहीं मराठा समाज आहे तो आरक्षणाबाबत तितकासा आग्रही नाही.
सरकारी नोकऱ्या मध्ये खुप मर्यादा आहेत.
शासकीय लाभाच्या इतर अनेक योजनांमध्ये मराठा समाजाला खुप संधी आहेत.
या बहुसंख्य समाजावर कोणताही अन्याय होऊ नये या विषयी कोणाचेही दुमत असणार नाही.
मग जरांगे यांना नेमकं काय साधायचे आहे.
परवा तर त्यांनी पत्रकारांशी बोलतांना एक वादग्रस्त विधान केले.ओबीसी मुस्लिम यांनाही मराठ्यां प्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे.
नेमक्या याच विधाना मुळे त्यांच्या आंदोलनाबाबत शंका निर्माण झाली आहे.
त्यांना मराठा समाजाचे हीत साधायचे आहे की कोणीतरी पुरस्कृत केलेले स्वस्तातले राजकारण साधायचे आहे हेच कळत नाही.
प्रत्येक समाज आपापल्या हक्कांसाठी लढत असतो. प्रा. हाके यांचे ही ओबीसी साठी उपोषण झाले.त्यांनी मराठा समाजाचे कसलेही अहित चिंतले नाही.फक्त आमच्या ताटातले ओढू नका असे म्हणाले.
त्यावर जरांगे यांनी दंड थोपटले.
जे शासनकर्ते आहेत त्यांनाही त्यांनी आव्हान दिले आहे.तुम्हाला निवडणुकीत पाडणार.
समजा दुसरे शासनकर्ते आले तर ते जरांगे यांच्या मागण्या घटना सोडून मान्य करू शकतील का ?
पंकजा मुंडे पराभूत झाल्या.त्या ओबीसी आंदोलनात सहभागी नव्हत्या .तरीही त्यांच्या विरुद्धच्या विजयी उमेदवारास हार घालून खांद्यावरून नाचवले.
हे कशाचे द्योतक आहे.?
मीच या विजयाचा शिल्पकार आहे असं तर त्यांना भासवायचे नव्हते ना ?
पंकजा मुंडे यांच्या प्रमाणे आणखीही कांहीं दिग्गज उमेदवार पराभूत झाले आहेत.
विजयाचे श्रेय घेण्याचा आणि दंड थोपटण्याच्या या प्रकारात राजकीय वास येऊ लागलाय असेच म्हणावे लागेल.
त्यात आता मुस्लिम ओबिसीना पण मराठ्या प्रमाणे आरक्षण मिळाले पाहिजे या विधानामुळे तर आंदोलनास दर्प सुटलाय असेच म्हणावे लागेल.
उपोषण आणि त्यामागील तळमळ समजू शकते.महात्मा गांधींनी देशाला दिलेले ते महान अहिंसक अस्त्र आहे.
राजकारणाचे शस्त्र नव्हे.
धर्मानुसार आरक्षण देता येत नाही हे घटनेत आहे.अल्प संख्याक म्हणून सर्व धर्मांतील दुर्बल घटकांना सवलती मिळतच आहेत.
मराठा समाजासाठी चाललेल्या आंदोलनात हे विधान घुसडण्याचे कांहीच कारण नव्हते.
या लेखाचा लेखक मराठा आहे .पोट तिडकिने मनातून उचंबळून आलेल्या या भावना आहेत.
माझ्या मराठा बांधवांनी खरंच सावध होण्याची गरज आहे. दिल्लीवर तुम्हीं राज्य केले.महाराष्ट्रावर कित्येक वर्षे केले.
पण कोणावर उगीचच तुम्हीं दंड थोपटले नाहीत.
टाचणी पडली तरी ऐकू यावे असे एक्कावन्न मोर्चे काढले .मुस्लिम बांधवांनी मोठा भाऊ मानून जागोजागी या मोर्चा ना अन्न व पाणी पुरविले होते.
या आंदोलनास राजकारणाचा वास येऊ नये एवढीच इच्छा.
जय शिवराय



