महिला महाराष्ट्र केसरी पै.अमृता शशिकांत पुजारी ही रौप्यपदकाची मानकरी ठरली.

Kolhapur news
By -

 

                  


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     अमान,जॉर्डन येथे सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत पै.अमृता शशिकांत पुजारी ने भारत देशाला  रौप्यपदक मिळवून दिले.

 लाेकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय SAI कुस्ती संकुल मुरगूड ची  ती कुस्तीगीर आहे


 नुकत्याच दिल्ली मध्ये झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीतून अमृताने 72 किलो वजन गटात आपले वर्चस्व ठेवत भारतीय कुस्ती संघामध्ये आपले स्थान निश्चित करणारी या स्पर्धेतील महाराष्ट्रातील एकमेव कुस्तीगीर असून अमान ,जॉर्डन येथे सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत मिळालेल्या संधीचा स्वतःच्या कारकिर्दीमधील पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला धबधबा तयार करण्यात अमृताला यश आले.


अमृताला आंतरराष्ट्रीय NIS कुस्ती कोच

 श्री.दादासो लवटे  श्री.सुखदेव येरुडकर वस्ताद  श्री.दयानंद खतकर श्री.सागर देसाई  यांचे मार्गदर्शन तर श्री. संजयदादा मंडलिक श्री.विरेंद्र भैय्या मंडलिक

 श्री.चंद्रकांत चव्हाण(राज्य समन्वयक साई )

श्री.आण्‍णासो थोरवत कार्यवाहक 

डॉक्टर.प्रशांत आथणी ,मुरगूड नगरपरिषद,मुरगूड  यांचे प्रोत्साहन लाभले .