कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नवीन संच मान्यतेचा अन्यायकारक आदेश रद्द होण्यासाठी आपण अधिवेशन काळात शालेय शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन स्थगिती घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असे आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिले.
आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंत्री मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी भेट घेऊन या विषयावर सखोल चर्चा करून निवेदन सादर केले.
नवीन शाळा संच मान्यतेचा आदेश अन्यायकारक आहे. या चुकीच्या आदेशामुळे मुख्याध्यापक, शिक्षकांची अनेक पदे रद्द होणार आहेत. त्यामुळे हा आदेश रद्द करून शाळा तिथे मुख्याध्यापक हे धोरण राबवण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली .
या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, बाबासाहेब पाटील, आर. वाय. पाटील, के. के. पाटील, उदय पाटील, व्ही. जी. पोवार, भरत रसाळे, एस. के. पाटील, ए. आर.पाटील, जयसिंग पोवार, शानाजी माने, सुधाकर कोरवी होते.

