प्रदर्शनापूर्वीच ३६ राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून प्रदर्शनासह पुरस्कार प्राप्त केलेला 'गाभ' मराठी चित्रपट शुक्रवारी २१ जूनला प्रदर्शित होणार

Kolhapur news
By -

 

             
           


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क

प्रदर्शनापूर्वीच  ३६ राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून प्रदर्शनासह पुरस्कार प्राप्त केलेला 'गाभ' हा  मराठी चित्रपट शुक्रवारी (ता. २१) सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शासनाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृतरित्या निवडला गेलेला हा चित्रपट असून तेथे याचा जागतिक प्रिमिअर सुद्धा झाला आहे. 

 'गाभ'  चित्रपटाची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचेच असून ते चित्रपटाचे सहनिर्माता देखील आहेत. सन २००५ पासून लघुपट, माहितीपट निर्मिती क्षेत्रात आपल्या कार्याचा विलक्षण ठसा उमटविल्यानंतर 'गाभ' ही एक अत्यंत साधीसोपी ग्रामीण जीवनाशी निगडित, पण आजवर कधीही पडद्यावर न आलेली कथा मोठ्या पडद्यावर घेऊन आले आहेत. शेती, शेतकऱ्यांशी निगडित अनेक चित्रपट आले. विशेषतः शेतकरी आत्महत्या आणि त्यांचे प्रश्न या अनुषंगाने आलेल्या चित्रपटांची संख्या  भरपूर आहे .पण  निपाणीचे सुपुत्र अनुप जत्राटकर यांनी मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या, महत्त्वाच्या आणि चित्रपटांच्या इतिहासात कधीही मोठ्या पडद्यावर न आलेल्या प्रश्नाला हात घातला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या म्हशींना 'गाभ घालण्याच्या' अनुषंगाने भेडसावणारी समस्या म्हणजे रेड्यांची वानवा. दूध उत्पादनासाठी आवश्यक असणारी बाब म्हणजे गाभ घालण्याची प्रक्रिया. रेड्यांची संख्या ही फार कमी होत चालली आहे. नेमकी हीच समस्या 'गाभ' चित्रपटाच्या मध्यवर्ती आहे. माणसांत कमी होत चाललेली मुलींची संख्या या विरोधाभासावरती 'गाभ' हा चित्रपट भाष्य करतो.


प्रदर्शनापूर्वीच  ३६ राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून प्रदर्शनासह पुरस्कार प्राप्त केलेला 'गाभ'   मराठी चित्रपट शुक्रवारी  २१ जूनला  प्रदर्शित होणार