धर्मानुसार ध्रुवीकरण करणे लोकशाहीला धोकादायक.

Kolhapur news
By -

 

          


            कोल्हापूर न्यूज  / वि .रा .भोसले


      2024 च्या निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला आहे.एक्झीट पोल वाले तर पूर्ण फेल गेलेत.

    विश्लेषक म्हणतात की जनतेने अंदाज दिलाच नाही,तिने सर्वानाच धडा दिला वगैरे.

     वस्तुस्थिती काय आहे पाहू.

   मोदींचे सरकार पुन्हा आले असले तरी चारशे पार झाले नाही.240 वर थांबावे लागले.

  स्वतः मोदी फक्त दीड लाखाच्या फरकाने आले.

    गुप्तहेर मालिका मधून म्हंटले जाते तसे येथे पण


 'कुच्छ तो गडबड हैं '


     काय आहे ती गडबड की ज्यामुळे एक्झीट पोल वाल्यांच्या पण दांड्या उडाल्या.


    ती गडबड म्हणजे विरोधकांनी परदेशी पैशाच्या मदतीने देशभर तयार केलेला 'नेरेटिव्ह' होय.

   म्हणजे काय ?

१.विरोधकांनी सांगितले की संविधान बदलले जाणार .जे एकदम खोटे.

२.मुस्लिमांचे आरक्षण 

     हे धर्मावर आधारित आरक्षण काँग्रेस ने आपल्या अजेंड्यात घातले होते.तो मुद्दा मोदींनी आपल्या भाषणात सर्वत्र मांडला.त्यामुळे एक समज (नेरेटिव्ह ) तयार झाला की मोदी हिंदूचे च हीत पहात आहेत.थोडक्यात हिंदूंचे ध्रुवीकरण करत आहेत.

  अर्थात हे चुकीचे होते.

मुस्लिम समाजाचे मात्र ध्रुवीकरण होण्यास त्यामुळे मदत झाली.

   बंगाल मध्ये मोदींना खुप प्रतिसाद मिळाला होता.पण झाले उलटे.तेथे 37 संसद तृणमूल चे आले.सर्व मुस्लिम.

   म्हाणजे ध्रुवीकरण झालेच ना.

   सबका साथ सबका विकास गेला कोठे ?

   ' सबसे बडा रुपय्या '

हा रूपय्या आला कोठून ?

   त्याचे उत्तर वर आधीच दिले आहे.

   गरीब मुस्लिम महिलांच्या रांगाच्या रांगा मतदान केंद्रावर पहायला मिळाल्या.

  त्यानंतर तशाच रांगा काँग्रेस कार्यालयाजवळ ही पहायला मिळाल्या.8500 चे कसले क्रेडिट कार्ड त्यांना मिळाले होते.सर्व टिव्ही वर त्याचे चित्रण दाखवले गेले.


     कसली लोकशाही ?


 एन डी ए सरकारला आता फार मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

 कोणत्याही धर्माचे ध्रुवीकरण होणार नाही याची दखल घेतली पाहिजे.

    सबका साथ सबका विकास हे तळागाळापर्यंत पोचले पाहिजे.

 फुकट तर कांहीच नको.

 मुस्लिम समाजात फार गरीबी आहे हे माधवी लता यांनी सांगितले आहे.

  उघड आहे कारण हा समाज कांहीं बाहेरच्या देशातून आला नाही .इथलाच आहे.

बाहेरचे होते ते गेले.इथे धर्म पेरून गेले.


   त्यांच्या सकट सर्व गरिबांसाठी मोदींनी काय काय नाही केले ?


    घरे, शौचालये,मोफत,राशन, तीन तलाक रद्द , इस्पितळात मोफत उपचार, महिला सन्मान,मुलींना मोफत शिक्षण 

   सर्व कांहीं केले.

काय उपयोग ?

 शेवटी धार्मिक ध्रुवीकरण श्रेष्ठ ठरले.

 कर्नाटकात जे घडले ते देशात आता घडले.

   ध्रुवीकरण हे आपल्या लोकशाहीला धोकादायक आहे.

   सपा,काँग्रेस,टी एम सी कडे कसलाच विकासाचा अजेंडा नसताना त्यांनी बाजी मारली

 ही धोक्याची घंटा आहे.


जागतिक मंचावर भारत मधोमध उभा रहाणे हे काहींना नको आहे.

    आपले त्यांना सामील 

आहेत.