गलगले विद्यामंदिरच्या पायी दिंडीने गावामध्ये झाले भक्तीमय वातावरण

Kolhapur news
By -

 



              


         




                कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

गलगले विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी  आषाढी वारी निमित्त गावातून पायी दिंडी काढली. शाळेपासून दत्त मंदिरापर्यंत व दत्त मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत ही दिंडी निघाली . गावातून निघालेल्या या दिंडीमध्ये मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. माऊली, ज्ञानोबा, तुकाराम जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. गावात ठिक ठिकाणी सुहासिनी विठ्ठल रुक्मिणीच्या पायावरती पाणी घालून दर्शन घेत होते.  मंदिर समोरील मैदानात शालेय विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. मुलींनी  व उपस्थित पालक महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. सर्व मुले मुली अभंगाच्या तालावर दिंडीमध्ये मनमुराद नाचत होती.  दिंडी गावातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराजवळ आल्यावर सर्व मुलांनी दर्शन घेतले . विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील मुले दिंडीचे आकर्षण ठरली  ठरल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. दिंडी मंदिराजवळ आल्यानंतर आरतीने दिंडीची सांगता झाली . 


आषाढी वारीबद्दल शिक्षकांनी माहिती सांगितली. मुलांना खाऊ दिला. अतिशय उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणामध्ये आषाढी दिंडी सोहळा संपन्न झाला . संदीप पाटील यांचेकडून मुलांना महाप्रसाद देण्यात आला .


 या  दिंडी सोहळ्यासाठी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय जाधव , उपाध्यक्ष विजय पाटील , सदस्य अरुण वर्धन ,अजित पडळकर, मुख्याध्यापक पी बी कापसे , बाळनाथ डवरी ,रमेश कदम ,नूतन सकट ,वैशाली कदम ,निकिता माने , वर्धन मॅडम, अंगणवाडी सेविका संगीता पाटील व रेशमा पठाण, महिला वर्ग , पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या दिंडीसाठी पालक व व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले .