कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वेदगंगा पात्रा बाहेर पडली असून कुरणी बंधाऱ्यावर पाच फूट पाणी आहे.आणखी कांहीं तास संततधार पाऊस पडला तर जकात नाक्या जवळील.दत्त प्रसाद हॉल पर्यंत पाणी पसरू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
मुरगूड वाघापूर मार्गावर स्मशान भूमी जवळील दत्त मंदिरास पाण्याचा वेढा पडला आहे.पूर परिस्थितीचा प्रशासना मार्फत तथा पोलिस ठाण्यामार्फत संपूर्ण आढावा घेण्यात येत आहे.
कापशी रस्त्यास असलेला सर पिरजिराव तलाव हळू हळू भरण्यास सुरुवात झाली आहे.तलावात येवून मिळणाऱ्या ओढ्याचे पाणी वाढत आहे.धोक्याच्या ठिकाणी बॅरीकेट्स लावून वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
शिवभक्त व सामाजिक कार्यकर्त्यांची बचाव पथके सज्ज असून नगरपरिषदेला सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

