न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा संपन्न.

Kolhapur news
By -

 






                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


             आषाढी एकादशी सोहळा म्हणजे भक्ति, श्रद्धा आणि सामाजिक सद्भावना यांचा मेळा होय.

     माऊली हा या सोहळ्यातील परवलीचा शब्द.राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिबिंब यात उमटावे असा हा विशाल सोहळा असतो.

    विद्यार्थ्यांनाही या सोहळ्याची ओळख होणे गरजेचे असल्याने अनेक शाळा व शैक्षणीक संकुलात तो साजरा केला जातो.

   मुरगूड येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या बाल चमुने सुध्दा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा केला.

    अनेक पालकांनी आपल्या चिमुकल्यांना  विठ्ठल रुक्मिणी च्या  सुंदर रुपात सजविले होते.

येथील श्री महालक्ष्मी मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली .शिक्षक सुध्दा दिंडीत सामील झाले.

     वारकरी वेषातील मुलांनी टाळ मृदुंगाच्या तालावर भजने म्हंटली.