कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हमीदवाडा साखर कारखाना येथील आयडीयल इंग्लिश स्कूल ची गोकुळ आष्टमी बाल चमुंच्या दही हंडी ने साजरी करण्यात आली.
राधा कृष्ण यांच्या वेषातील मुलं आणि मुली यामुळे रंगारंग कार्यक्रम झाला.
मुख्याध्यापिका सौ. स्वाति घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.श्रीकृष्णाच्या बाल लीला त्यांनी मुलांना सांगितल्या.भक्त आणि भक्ती यांचे अनन्यसाधारण महत्व पालकांनाही त्यांनी समजावून दिले.राधा आणि कृष्ण ही प्रतिके आहेत.कृष्ण म्हणजे सर्व सामान्यांच्या दैनंदिन जीवनातील सवंगड्या सारखा आहे .त्यांनी सांगितलेली गीता साऱ्या विश्वाला मार्गदर्शक ठरली आहे असे त्यांनी सांगितले.




