कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गोकुळ दूध संघाचे संचालक व संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी नानीबाई चिखलीतील सर्व गणेश तरुण मंडळांना भेटी देऊन गणेश दर्शन घेतले. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान ,उपसरपंच कुमार संकपाळ , अण्णासाहेब वडगुले ,माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद ,ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले, माजी सरपंच मंहम्मद मुल्लाणी, राजाराम पाटील , बशीर नदाफ , सचिन सूर्यवंशी ,बाबुराव वाडकर ,वैभव गळतगे, राजेंद्र चौगुले, ,सागर पाटील, बाजीराव वाडकर ,महेश गळतगे यांच्यासह सर्व तरुण मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. महिला वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
एकता तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. स्व. संदीप वडगुले यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . बक्षीस वितरण गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी बिद्रीचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले, अण्णासाहेब वडगुले, बाजीराव वाडकर आदी उपस्थित होते. अनिल मगदूम, प्रा.अजित डवरी, सुनील मार्तंड, नजीर नाईक यांनी परीक्षक म्हणून काम केले. बशीर नदाफ यांनी आभार मानले.
या स्पर्धेतील विजेते स्पर्धक असे :-
प्रथम क्रमांक - मेहरूनिसा झाकीर नाईक,
साक्षी अजित शिंदे
द्वितीय क्रमांक - श्रेया विजय संकपाळ,
आदिती सचिन खरबुडे
तृतीय क्रमांक - ऐश्वर्या धनंजय पाेवार
सुरभी सुरेश पाटणकर
उत्तेजनार्थ - स्वप्नाली दीपक कोरे
श्वेता अविनाश पोतदार
तनिष्का सुधाकर बेनाडे

































