केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का ?

Kolhapur news
By -

  

    मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. पण महायुती सरकार विशेषतः राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची तरी कुणाकडे? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी महायुती सरकारवर निशाणा साधताना उपस्थित केला.


केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याचा दौरा करून तात्काळ ३,४४८ कोटींची या राज्यांना मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात अद्याप केंद्रीय कृषीमंत्री आले नाहीत. त्यासाठी महायुती सकारने पाठपुरावा केला नाही. केंद्र सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत का? केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून महाराष्ट्राला ही सापत्न वागणूक का? केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? अशा प्रश्नांचा भडीमार करत त्यांनी राज्य आणि केंद्र शासनावर निशाणा साधला . 

------------------