गॅससाठी 'ओटीपी'च्या तागाद्याने ग्राहक हैराण

Kolhapur news
By -

 

   




               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


निपाणी शहर व परिसरातील नागरिकांना गॅस तुटवड्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे .गेल्या १५ दिवसापासून नागरिकांना गॅस साठी हेलपाटे घालावे लागत आहेत. नंबर लावल्या नंतर गॅस धारकांना 8 ते 10 दिवसाने गॅस मिळत असून या मुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे ,आणि त्यातच ग्राहकांकडून OTP साठी तगादा लावला जात आहे .


आपल्या भागातच नाही तर भारत देशात असे अनेक वंचित लोक आहेत कि ज्यांच्या जवळ अजूनही मोबाइल नाहीत. आणि असेल तरी नंबर लावता न येणारेही अनेक वयोवृध्द नागरिक आहेत, असे लोक दुसऱ्यांच्या वर निर्धारित राहून नंबर लावतात. आपला भारत देश  डिजिटल इंडिया होत असल्यामुले नागरिकांना सुलभ होईल असेच काहीसे वाटत होत पण निपाणी भागातील गॅस धारकांची परिस्तिथी पहिली तर काही वेगळेच  चित्र पहावयास मिळत आहे  .OTP च्या नावाखाली गॅस कंपन्यांमार्फत नागरीकांचे हाल होत असून या वरती लवकरात लवकर तोडगा काढावा असे सर्वसामान्य नागरिक व  4 JR ह्युमन राईटस् केअर आँरगेनायझेशनच्यावतीने   मागणी हाेत आहे. 

--------------