जिलेबीची फॅक्टरी .. तिचा पत्ता सापडेना.. बेकारांची फुकट फेरी..

Kolhapur news
By -

 

           


      कोल्हापूर न्यूज  /  ज्येष्ठ पत्रकार वि .रा.भोसले


      सोशल मिडियावर जिलेबी फॅक्टरी जोरात व्हायरल होत आहे.

   जिलेबीच्या फॅक्टरीची आयडिया संसदेतील विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी दिली असल्याचे समजले.ते असे म्हणाले  की ,जिलेबी देशभर जाऊदे.येवढेच नव्हे तर परदेशात सुध्दा जाऊदे .म्हणजे या देशातील बेकारी नाहीशी होईल.

  याला पुरावे पण आहेत.त्यांची हरियाणा निवडणुकीतील भाषणे देशभर पोचली आहेत.

    एक राष्ट्रीय नेता असं बोलतोय म्हंटल्यानंतर तमाम बेकार बांधवांची धावपळ सुरू व्हायला कितीसा वेळ लागणार ?

   पाठीवर कोरडी भाकरी बांधून बिचारे जिलेबी फॅक्टरी शोधायला निघाले.पण त्यांची फेरी फुकट गेली.

     जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची याहून मोठी थट्टा कोणती असेल  ?....

    असा एक अभ्यासू (?) नेता सत्ताधारी पक्षाच्या विरोधात निवडला गेला आहे ही त्याहून मोठी थट्टा असावी असे वाटते.

     एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या एका राष्ट्रीय पक्षाने असे नेतृत्व स्वीकारले तरी कसे आहे ?

    हे तसे गौड बंगाल नव्हे.ही केवळ एक अपरिहार्यता आहे.देशभर नाव असणारा , घराणेशाहीचा शिक्का असणारा आणि पूर्वजांच्या मुळे मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ झालेला एक म्होरक्या पक्षाला हवा होता.

  राहुल गांधी या पठडीत बरोबर बसतात.अर्थात हे नेतृत्व सर्व काँग्रेस वाल्यांना मान्य होते असे नव्हे. राहुल व सोनिया यांच्या बेलगाम आणि बेजबाबदार कारभाराला कंटाळून अनेकांनी या पक्षाचा त्याग केला आहे.

 स्वतःचा आब राखून पक्षात काम करणारी कपिल सिब्बल,आझाद यांच्यासारखी  तीस भर नेते मंडळी बाहेर पडली आहेत.

    आता जे बरोबर आहेत त्यांना फक्त प्रादेशिक मान्यता आहे.त्यामुळे देशभर ओळख असणारे राहुल गांधी यांच्या सारखे नेतृत्व स्विकारण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. अशोक चव्हाण यांच्या सारखे उच्चशिक्षित नेते पण अलीकडे बाहेर पडले आहेत.

    तरीही राहुल यांचे नेतृत्व टिकून आहे ते एका नॅरेटिव्ह मुळे. कट्टर विचारसरणीचे कांहीं लोक,पंथ या देशात अजूनही आहेत.त्यांचा फायदा धूर्त राजकीय पुढारी उचलत असतात.

    सत्ताधारी पक्षाच्या त्रुटी  शोधून  त्यावर घाव घालणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते.लाऊड आवाजाचा राहुल सारखा नेता त्यांना हवाच असतो.त्यांनी मग कांहीही बोललेले ते चालवून घेतात. खपवून नव्हे.

   लोकशाहीची ही आणखी एक थट्टा म्हणावी लागेल.

       नॅरेटिव्ह चे वेगवेगळे नमुने आहेत.दिवाळीतल्या आपटबारा प्रमाणे ते फोडत रहायचे.

  उदा. बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे.

 शरीयत धोक्यात आहे.बी जे पी हा बामनांचा पक्ष आहे. हिंदुत्व म्हणजे मनुवादी आहे.असे अनेक फंडे भोळ्या भाबड्या मतदारांच्या माथी मारले जातात.त्याची लाट देशभर कशी पसरेल हे पहिले जाते.

     त्यासाठी राहुल गांधी यांच्या सारखे नेतृत्व सुध्दा चालवून घ्यावे लागते.

    बटाट्या पासून सोने, जीलेबीची फॅक्टरी , हिंसक हिंदू, मोहब्बत के दुकान अशी पोरकट विधाने सुध्दा चालवून घ्यावी लागतात.

'खपवून' नव्हे असे पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटते  कारण जगातल्या या विशाल लोकशाहीची ही थट्टा आहे हे त्यांच्या सर्व साथीदारांना सुध्दा माहिती असते. 

  सत्तेचे सोपान चढायचे असतील तर  दगडी पायऱ्या सुध्दा चालतात.

 लोकशाहीचा विजय असो.

---------------------------------------------------------