बीड :बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ठराविक मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 24 सरपंचांसह 820 ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्दबातल केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे.
यासंबंधीच्या माहितीतनुसार, 2020 ते 25 या कालावधीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य झालेल्या सदस्यांनी ठराविक मुदतीत आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव असणाऱ्या जागांवर निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक असते. पण या सदस्यांनी हे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे गावगाडा चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिल्याचा दावा केला जात आहे.
---------------------------------------------

