कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वयानुरूप विद्यार्थी नोंद करण्यासाठी राज्य शासनाचे बंद असलेले So 2 टॅब सुरू करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने मान . शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे व शिक्षण संचालक (प्राथमिक )पुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .
समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या मार्गदर्शना खाली याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथील शिक्षण निरीक्षक समरजितसिंह पाटील यांना शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे व अण्णासाहेब कोळी यांनी दिले .
याबाबतचा मेल सुद्धा शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना करण्यात आला .या निवेदनांत म्हंटले आहे की ,यु डायस प्लस मध्ये वयानुरूप दाखल करावयच्या मुलांची नोंदणी SO 2 tab द्वारे करण्यात येते . तथापि हा टॅब बंद असल्याने राज्यांतील एक लाख शाळांना वयानुरूप दाखल मुलांची नावे नोंद करता येत नाहीत . त्यामुळे ३०सप्टेंबर या तारखेवर होणाऱ्या संच मान्यतेमध्ये हे विद्यार्थी न आल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचा व ही लाखो मुले शाळाबाह्य राहण्याचा धोका निर्माण होणार आहे . म्हणून यु-डायस मध्ये वयानुरूप विद्यार्थी नोंदणी करण्याकरता S02 टॅब तात्काळ कार्यान्वित करण्यात यावी अशी विनंती या निवेदनाद्वारे केली आहे .
सुलभ शिफारसीसह आपला प्रस्ताव तात्काळ शासनांकडे पाठविण्याचे आश्वासन शिक्षण निरीक्षक समरजीतसिंह पाटील यांनी दिले आहे .
-------------------

