कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जनसेवा हीच ईश्वर सेवा किंवा शिवभावे जीवसेवा या शुभाषिता ला तंतोतंत अर्थ प्राप्त करून देईल अशी स्वच्छता मोहीम सालाबाद प्रमाणे मुरगुड येथील युवकांनी चिमगाव च्या बागेश्वरी मठात सुरू केली. श्रावण महिन्यात मठात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. भक्त बंधु भगिनी मोठया संख्येने कडून यात सहभागी होत असतात. कीर्तन प्रवचन इत्यादी धार्मिक सोहळे आयोजित केले जातात. श्रावणात दर सोमवारी मठात उत्सव असतो.
मठाची आणि परिसराची स्वच्छता करण्यासाठी मुरगूडहून शिवभक्तांचा एक गट येथे येत असतो. त्यांच्या अगदी निरपेक्ष भावनेने स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. स्वच्छते मधून आपण ईश्वराची सेवा करतो असा भावनिक संदेशही त्यांच्यामार्फत जातो.ग्रामस्थांनी आणलेले भोजन किंवा इतर फराळाचे साहित्य सुद्धा ते घेत नाहीत. त्यांच्या या सेवेचे परिसरात कौतुक होते. या युवकांच्या समूहाकडून पूरग्रस्त विभागाला सुद्धा मदत पोचवण्याचे काम केले जाते.
स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेला संदेश या ठिकाणी महत्वाचा आहे.मंदिरात, मठात किंवा निसर्गात निवांत ठिकाणी जाऊन ध्यान धारणा केली म्हणजे ईश्वर सेवा होते असे नाही. सर्व जीवांची सेवा निरीच्छ भावनेने केली तर ती सुद्धा ईश्वरापर्यंत पोचते. यालाच शिवभावे जीवसेवा असे ही म्हणतात.
----------------------

