हॉटेल "परिपक्व" चे दिमाखात उद्घाटन

Kolhapur news
By -

 


              


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     गुरुवार दि. २२ फेब्रुवारी २०२४ राेजी गुरुपुष्यामृत च्या शुभमुहुर्तावर दुपारी निपाणी-मुरगुड रोड, जोतिर्लंग पेट्रोलपंप शेजारी, नरसोबा माळ, कोडणी येथे नानीबाई चिखली येथील माजी सरपंच बाळासाहेब काटकर व गोपाळ काटकर संचलित "हॉटेल परिपक्व" चे उद्घाटन प. पू. श्री. रत्नकांत शिंदे (काकाश्री) यांच्या अमृत हस्ते झाले. 

       काटकर बंधूंच्या चिखली येथील हॉटेल पर्व ला ग्राहकांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ हॉटेल "परिपक्व" सुरू केले आहे . 

           उद्घाटन कार्यक्रमाचे संयोजन नानीबाई चिखलीचे माजी सरपंच बाळासाहेब काटकर ,गोपाळ काटकर , कुणाल काटकर , नंदीनी काटकर, प्रतिक काटकर यांनी केले .