छात्रसेना व व्हाईट आर्मी विभाग देवचंद महाविद्यालय अर्जुननगर यांचे संयुक्त विद्यमाने सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन

Kolhapur news
By -

 

             




               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        छात्रसेना व व्हाईट आर्मी विभाग देवचंद महाविद्यालय अर्जुननगर यांचे संयुक्त विद्यमाने सत्कार व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण ( 56 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.कोल्हापूर),व्हाईट आर्मी कोल्हापूर चे संस्थापक मा.अशोक रोकडे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्या डाॅ.जी. डी.इंगळे मॅडम उपस्थित होते. 

प्रथम सैनिक म्हणून निवड झालेल्या छात्रांचा साईनाथ खोत,प्रशांत खवरे,विशाल भोसले,राजवर्धन देसाई,अथर्व पाटील,निरंजन पाटील,अश्विनी धोंडफोडे,प्राजक्ता सावंत यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.त्याचबरोबर दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय थलसेना कॅम्पमध्ये सहभागी होवून मॅपरिडींग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जे.यु.ओ.आकांक्षा आरडे,बेस्ट सिनीयर म्हणून एस.यु.ओ.ओंकार खोत,बेस्ट कॅडेट 2024 म्हणून वैष्णवी चौगुले,बेस्ट लिडर म्हणून श्रध्दा पाटील,हर्षदा खाडे,प्रथमेश भोसले,प्रणव सांगवडे तर व्हाईट आर्मी डी.सी.ए.संयोजक म्हणून  अमित कांबळे यांच्या सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना सुभेदार मेजर रवींद्र चव्हाण यानी सांगीतले की मी या काॅलेजचा माजी विद्यार्थी असून आज मी लष्करात यापदावरती पोहचलो त्यामध्ये देवचंद कॉलेजचा सिंहाचा वाटा आहे.माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांचे कल्याण  या काॅलेज मुळेच झाले आहे.सर्व छात्रांनी इथे गुरूकडून मिळणार्‍या संस्कार तिजोरीवर आपले आयुष्य घडवावे.मला अभिमान आहे मला इथे शिकायला मिळाले.मी अभिमानाने सांगतो की  देवचंद महाविद्यालयाचा एन.सी.सी.विभाग एक नामांकित  युनिट आहे.

अशोक रोकडे यानी बोलताना सांगीतले की आजच्या युवपिढीवर या वयातच समाजसेवेचे संस्कार करायला पाहिजेत तरच समाजातील व्रृध्दाश्रमांची वाढती संख्या कमी होईल, याकरिता व्हाईट आर्मी यथायोग्य प्रयत्न करीत आहे. मला आनंद वाटतो की या उपक्रमात देवचंद महाविद्यालय अग्रेसर आहे.हा आदर्श घेऊन इतर महाविद्यालये सहभागी होत आहेत.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डाॅ.जी.डी.इंगळे सांगीतले की आमच्या महाविद्यालयाचा एन.सी.सी.विभाग  खूप कार्यक्षम ,उपक्रमशील , छात्राच्या सर्वांगीण विकासाकरिता सतत प्रयत्नशील असते.

निरोप समारंभाच्या निमित्त  ओंकार खोत,प्रथमेश पाटील,मयूरी चौगुले ,आकांक्षा आरडे व वैष्णवी चौगुले  यांनी आपल्या मनोगतात एन.सी.सी. विभागाने तीन वर्षांत छात्रांच्या कौशल्य विकासात घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करुन ऋण व्यक्त केले.यावेळी छात्र सेना व व्हाईट आर्मीच्या छात्रांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्रसेना व व्हाईट आर्मी विभाग प्रमुख मेजर डाव.अशोक डोनर यांनी केले, आभार प्रदर्शन सृष्टी पाटील व पूजा तोरसे सूत्रसंचालन समीक्षा भोसले व साक्षी खराडे यानी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ सुर्यवंशी,सौरभ पोटले,अभिजीत साबळे,मतकरी एस.एस.यानी परीश्रम घेतले.यावेळी उपप्राचार्य ए.डी.पवार.,पर्यवेक्षीका  एस. पी.जाधव,डाॅ रवींद्र चव्हाण,प्रा.प्रशांत कुंभार व मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह,उपाध्यक्षा डाॅ.तृप्तीभाभी शाह,खजिनदार सुबोधभाई शाह ,मा.अशोक रोकडे,कर्नल पुनीत गोगीआ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सर्वांकरीता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.