कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सामाजिक कार्यकर्ते ओंकार पोतदार यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेऊन राज्य स्तरीय शिवाजी महाराज मोटीवेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार संस्कृती व मानव सेवासंस्था पणजी (गोवा) यांच्या मार्फत पणजी येथेच देण्यात आला.यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ,हितेंद्र सावंत,कीर्ती चक्र विजेते अनंत जोशी अभिनेत्री सपना वधवा ,अमोल भगत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ओंकार पोतदार यांनी गरजू गरीब लोकांना अन्न व जिवनावशक वस्तू पुरवणे,ब्लँकेट पुरवणे,सामजिक प्रश्ना साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करून ते मार्गी लावणे,इत्यादी कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.
याबध्दल मुरगूड येथे शिवतीर्थावर त्यांचा नागरिक व मित्र परिवार यांचे मार्फत जाहीर सत्कार करण्यात आला.या वेळी प्रा.चंद्रकांत जाधव,सर्जेराव भाट ,संकेत शहा,सोमनाथ यरनाळकर,तानाजी भराडे,अमर सणगर,प्रकाश पारिष्वाड इत्यादी उपस्थित होते.

