मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीच्या आधारे चार टप्प्यात 47 लाख 60 हजार रुपयांची रक्कम काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालयातील बँकेत सदरील प्रकार घडला असून त्यामुळे प्रशासकीय विभाग चांगलाच हादरला आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राज्यात शालेय शिक्षण विभागाचे बनावट बनावट चेक आणि साक्षरीच्या आधारे चार टप्प्यात 47 लाख 60 हजार रुपयांची रक्कम काढल्याची माहिती समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले हे पैसे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झिनत खातून या व्यक्तिंच्या खात्यावर जमा झाल्याचे देखील तपासात पुढे आले आहे. मात्र, हे चारही नावे कोणाची आहेत? यामागे नेमका कोणाचा हात आहे? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अधिक तपास पोलिस अधिकारी करत आहेत.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालयातील बँकेत असलेल्या खात्यातून ही रक्कम काढण्यात आली आहे. मंत्रालयातील बँकेतच असे प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

