महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा पालथ होईल , छोटे पक्ष आघाडी घेतील ; नानीबाई चिखलीतील हालसिद्धनाथ यात्रेत वाघापूरच्या कृष्णात ढोणे महाराजांची ( नाथांची ) भाकणूक

Kolhapur news
By -

 

             



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

       महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा पालथ होईल , छोटे पक्ष आघाडी घेतील, येत्या शंभर वर्षांत मनुष्य पृथ्वी सोडून  पर ग्रहावर राहायला जाईल ,जगातील देश एकमेकाशी युद्ध खेळतील ,चालता बोलता मनुष्याला मरण येईल  अशी भविष्यवाणी म्हणजे भाकणूक  कृष्णात ढोणे महाराज वाघापूर यांनी नानीबाई चिखली येथील हालसिद्धनाथ यात्रेत कथन केली . 


चिखली गाव प्रती आप्पाचीवाडी होईल, चिखली गावाला माझा आशिर्वाद हाय , दुनिया पेटंल काळ रात्र येईल ,धुळ माती गा उडल सांभाळुण रहा ,  हातात भाकरी भाड्यावर चाबुक हाय हाय की गा हाय , ठेचाला मरण हाय कोंबड गा कोंबड माणसीच्या माग गा लागल , चैत्रीच्या पौर्णिमाला माझा इथ सोहळा भरतोया ,येईल येईल कापा कापी येईल ,चालवीण चालवीन डोण्या बाळाची गादी चालवीन ,वागाव वागाव तुम्ही सत्यान वागाव, कष्टाची भाकरी माणसाला आनंदात ठेवेल, आरक्षणाच्या नावाखाली शासन मज्जा बघंल, समाजा समाजात भांडणं लावतील, सर्व जाती आरक्षणासाठी आंदोलन करतील , जग दुनियेत एक मोठ नाव होईल , देशात मोठा कायदा येईल, हाय की गा हाय ठेचाला मरण हाय

ऊसाचा बाळांनो काऊस होईल , माझं माझं म्हणू नका माणसाला माणूस खाऊन टाकील, येतील येतील लाकडाची डोरली येतील, रसाला धारण माणसाला मरण ,तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, येईल येईल राज्य गुंडांचे येईल, महागाईचा भस्मासूर येईल, सामान्य माणसाला जगणं मुश्कील होईल, ऊन्हाळ्याचा पावसाळा होईल, अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल, नदीकाठावरील जमीन ओसाड पडेल, गर्वानं वागू नका, गर्वाचं घर खालीच होईल, होईल होईल भूकंप होईल, १८ तरेचै माणसाला आजार होतील , मेघाच्या पोठी मोठा आजार हाय ,  गावातील माणूस जंगलात जाईल, बारा
बलुतेदारांना सुखी ठेवीन. 

       वालगे व पंच कमिटी चिखली यांनी यात्रेचे संयोजन केले .