रायगड : अजित पवार निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे संकेत देत आहेत. ते भविष्यात तुमचे पाय पाय धरतील. पण तुम्ही धरू देऊ नका. कारण, तुम्ही त्यांना पाय धरू द्याल आणि आम्हाला येथून बाहेर काढाल. त्यामुळे तुम्ही त्यांना जवळ न घेण्याचा शब्द आम्हाला द्या, असे साकडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना घातले.
रायगड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेला शेकापचे नेते जयंत पाटील व शरद पवार उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. तसेच शरद पवारांना त्यांना थारा न देण्याचे आवाहन केले. जयंत पाटील शरद पवारांकडे पाहत म्हणाले की, तुम्ही त्या गद्दाराला खूप मोठे केले. त्यांचे नको तेवढे पोट भरले. पण आज वर्तमानपत्र वाचल्यानंतर माझे मन चलबिचल झाले. अजित पवार निवडणुकीनंतर
रायगड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेला शेकापचे नेते जयंत पाटील व शरद पवार उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. तसेच शरद पवारांना त्यांना थारा न देण्याचे आवाहन केले. जयंत पाटील शरद पवारांकडे पाहत म्हणाले की, तुम्ही त्या गद्दाराला खूप मोठे केले. त्यांचे नको तेवढे पोट भरले. पण आज वर्तमानपत्र वाचल्यानंतर माझे मन चलबिचल झाले. अजित पवार निवडणुकीनंतर एकत्र येण्याचे सांगतो असे म्हणत आहेत.
या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. त्यानंतर ते तुमचे पाय धरण्यास येतील. पण तुम्ही त्यांना तुमचे पाय धरू देऊ नका. कारण, तुम्ही त्यांना पाय धरण्याची संधी द्याल आणि आम्हाला येथून बाहेर काढाल. त्यामुळे तुम्ही आम्हाला शब्द द्या, असे जयंत पाटील म्हणाले.

