मुरगूड चे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शहा यांचेकडून एस टी महामंडळाच्या बसेस साठी १०० फलक .

Kolhapur news
By -

 

         



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क



मुरगूड येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध व्यापारी प्रशांत शहा यांनी  एस टी महा मंडळाच्या बसेस ना १०० फलक देणगी स्वरूपात दिले.



  एस टी ची लाल परी राज्यातील दैनंदिन ग्रामीण जीवनाशी जिव्हाळ्याने जोडली गेली आहे. प्रवासाच्या अनेक खाजगी सुविधा  उपलब्ध असून सुद्धा एस टी कडची गर्दी कमि होण्याचे नाव घेत नाही. याला कारण एस टी ने दिलेल्या अनेक सवलती आणि आराम दायक प्रवसाच्या सुविधा होय.



   प्रवासी संख्या वाढत गेली तशी बसची संख्या व फेऱ्या सुद्धा  वाढत गेल्या. त्यामुळे त्यांना फलकांची संख्या सुद्धा अपुरी पडू लागली. नवीन फलक तयार होण्यास कालावधी जाणार होता. अशा वेळी प्रशांत शहा यांनी स्वखर्चाने महामंडळाच्या  गारगोटी आगारा साठी १०० फलक (बोर्ड ) देण्याची घोषणा केली व लगेच ती अमलात सुद्धा आणली.



  एस टी च्या मुरगूड बस स्थानकावर हा फलक प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. मुरगूड शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील डेळेकर,जिल्हा पत्रकार संघाचे सचिव प्रकाश तिराळे, जेष्ठ पत्रकार वि. रा. भोसले व भैरवनाथ डवरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान सोहळा संपन्न झाला. पत्रकार राजू चव्हाण यांनी स्वागत केले व एस टी चे वाहतूक नियंत्रक बाबुराव परीट यांनी प्रास्ताविक केले.



    सणाचे दिवस असल्याने बस स्थानक लहान थोर प्रवाशांनी खचाखच भरले होते.शाळा, महाविद्यालयांचे विदयार्थी व विद्यार्थिनी सुद्धा मोठया संख्येने होते. एस टी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा शहा यांच्या सामाजिक जाणीवेचे व औदार्या चे स्वागत व कौतुक केले. लाल परीच्या आपुलकीच्या सेवेची तथा लोकप्रियतेची ही पोच पावती म्हणावी लागेल अशा भावना या वेळी व्यक्त झाल्या.


                  ------------------------