मंत्री मुश्रीफांच्या आरोपाच्या संशयाची सुई महायुतीतील नेते मंडळींच्या भोवतीच : केडीसी बँकेच्या आगामी निवडणुकी संदर्भात काय करायचे हे मंत्री मुश्रीफांनी ठरवावे - सतेज पाटील

Kolhapur news
By -

  

                



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क



     गोकुळ निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफ यांनी चिरंजीव नवीद मुश्रीफ यांच्या पराभवावर बोलताना माझ्या मुलाविरुद्ध षड्यंत्र रचले गेले असा आरोप केला असुन त्या आरोपाच्या अनुषंगाने बोलताना आमदार सतेज पाटील यांनी  "गोकुळ निवडणुकीच्या अगोदर महायुतीतील सारे नेतेमंडळी आमच्याकडे चार हजार चारशे ठराव आहेत असे सांगत होते , मग मंत्री मुश्रीफ यांच्या मुलाविरुद्ध षडयंत्र कोणी रचले ? हे त्यांनी तपासून पाहावे. आता तर केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी जो आरोप केला आहे त्यानुसार त्यांच्या आरोपाच्या संशयाची सुई महायुतीतील नेते  मंडळींच्या भोवतीच फिरत आहे, समविचारी आघाडी म्हणून मी माझ्या पॅनेलमधील सगळ्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे, मग महायुतीमध्ये कोणी कोणावर षड्यंत्र रचले हे त्यांनी आत्मचिंतन करावे " असे म्हटंले आहे. 


   मंञी  मुश्रीफ यांनी आत्मचिंतन करावे आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात काय करायला पाहिजे ? हे त्यांनी ठरवावे.' असे ही आमदार सतेज पाटील यांनी म्हंटले  .


           --------------------