कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील रौप्यपदक विजेती अमृता पुजारी आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक दादासो लवटे यांना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी कार्यालयात निमंत्रित करून सन्मानित केले.
प्रशासनाकडून मिळणारी कौतुकाची थाप खेळाडूंच्या जिद्दीला बळ देते, नव्या स्वप्नांना पंख देते आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरणा देते.
डॉ राठोड यांनी अमृता ची कौटुंबिक परिस्थिती समजावून घेतली. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने जागतिक पातळीवर एवढे यश मिळवणे हे कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. जिल्हा प्रशासन नेहमीच अशा जिद्दी खेळाडूंना प्रोत्साहन व योग्य ते सहकार्य करेल असे ते म्हणाले.
मुंबईत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे अभिनंदन केले .
---------------------


