पोहताना दम लागून तरुणाचा मृत्यू

Kolhapur news
By -

 

            


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कागल येथील पाझर तलावमधील धबधबा पाहण्यासाठी गेलेले मनोज सदाशिव मोरडे (वय ४४, रा. विराज सिटी, मूळ गाव चिखली, ता. कागल) हे धबधब्याचा आनंद घेऊन परत तलावात पोहण्यासाठी गेले असता दम लागून बुडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कागल पोलिसांत नोंद झाली आहे. मोरडे हे मित्रांसोबत रविवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे.