कोल्हापुरात पाच लाखांच्या बक्षिसांची झिम्मा फुगडी स्पर्धा

Kolhapur news
By -

 


        


                


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १५ व्या वर्षी बुधवार दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे झिम्मा -फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. 


या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेमध्ये युवतींचा सहभाग वाढावा आणि युवतींनाही स्पर्धेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवता यावे, याकरता १२ ते १८ वयोगटातील युवतींसाठी ५० हजार रुपये बक्षिसांची वेगळी सांघिक झिम्मा स्पर्धा घेतली जाणार आहे, अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.