छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारी विचारधाराच सध्या देशाची घटना संपण्याच्या प्रयत्नात आहे - राहुल गांधी

Kolhapur news
By -





                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क

         छत्रपती शिवाजी महाराज यांनी हजारो वर्षापूर्वी राज्याभिषेक केला. मात्र ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करू दिला नाही. तीच विचारधारा आजही देशात आहे. ही विचारधाराच देशाची घटना संपण्याच्या प्रयत्नात आहे . त्यांनीच मालवणला शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला. मात्र तो पुतळा काही दिवसातच कोसळला. कारण यांची विचारधारा चुकीची आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानं त्यांना इशारा दिला.पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला, अशी टीका राहुल गांधी यांनी विरोधकांवर केली. 

 

  कोल्हापूर येथील कसबा बावडा येथे शिवछत्रपतींच्या  पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी  विरोधकांच्यावर जोरदार टीका केली. 


  राहुल गांधी म्हणाले ,छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य साऱ्यांना प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. सर्वांना सोबतीला घेऊन सर्वांना न्याय ही भूमिका ठेवली. त्यांच्या या विचारसरणीची आजही नितांत गरज आहे. शिवाजी महाराज व शाहू महाराज यांची विचारधाराच संविधानात आहे. काही मंडळी शिवरायांचे नाव घेतात पण संविधानाला धोका पोहोचवतात असा निशाणाही त्यांनी यावेळी विरोधकांच्यावर साधला. 


    आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून हा पुतळा बसवण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण , खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ,  खासदार विशाल पाटील ,आमदार विश्वजीत कदम , आमदार प्रणिती शिंदे रजनीताई पाटील, प्रणितीताई शिंदे, चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, नसीम खान, विश्र्वजीत कदम, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, राहुल पी. एन. पाटील यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सभापती, उपसभापती, आदी मान्यवर उपस्थित होते. संजय डी पाटील ,आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले . हा सोहळा करण्यासाठी पुतळा समितीचे सदस्य, कसबा बावडा, लाइन बाजार वासीय, सर्व तरुण मंडळे यांनी मनापासून सक्रिय सहभाग घेतला. 



-----------------------------------------------------