मी एक आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलो आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Kolhapur news
By -

 

      


   ठाणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथील सभेत विकास साधण्यासाठी व काँग्रेस सरकारने केलेले खड्डे बुजवण्यासाठी आपल्या सरकारला डबल कष्ट करावे लागत असल्याचा आरोप केला. आज सर्वच जनता विकसित भारताचे स्वप्न पाहत आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला विकासही करायचा आहे आणि काँग्रेस सरकारने केलेले खड्डेही बुजवायचे आहेत, असे मोदी म्हणाले. 

मी एक आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलो आहे. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा केवळ मराठी भाषा व महाराष्ट्राचा सन्मान नव्हे तर देशाला ज्ञान, दर्शन, आध्यात्म व साहित्याची समृद्धी देणाऱ्या परंपरेचा सन्मान आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प, छेडा नगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपले सरकार विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. 


  मोदी म्हणाले, आज सर्वच देशवासियांचे स्वप्न विकसित भारताचे आहे. त्यामुळे आमच्या सरकारचे सर्वच निर्णय विकसित भारताला समर्पित आहेत. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला मुंबई व ठाण्यासारख्या शहरांना फ्यूरच रेडी बनवायचे आहे. पण यासाठी आपल्याला डबल कष्ट घ्यावे लागत आहेत. 

-------------------------------------------------