विश्वविजेत्या महिला खो खो संघातील वैष्णवीच्या स्वागतासाठी मुरगूड सज्ज.

Kolhapur news
By -

       


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   मुरगूड जवळील करंजिवणे गावची  खोखो खेळाडू कु. वैष्णवी बजरंग पोवार हीची विश्विविजेत्या भारतीय महिला खो खो संघात निवड झाली होती.या खेळातील तिचे नैपुण्य तिने तेथे सिध्द करून तर दाखवले आहेच शिवाय आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नावही तिने झळकावले आहे.तिच्या भव्य सत्कारासाठी मुरगूड नगरी सज्ज झाली आहे.
    

  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सत्कारा मुळे ग्रामीण भागातील मुलामुलींना प्रोत्साहन मिळते.त्यातून नवीन उत्तमोत्तम खेळाडू तयार होतील असे मत संयोजक  मंडळांकडून व्यक्त करण्यात आले.
     

    सोमवार  दिनांक २७ जानेवारी रोजी ४वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे व शिवतीर्थावर भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

    युवक ,युवती ,विद्यार्थी व क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समिती मार्फत करण्यात येत आहे.

   
              ----------------------------