कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाकडून केली जाते. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान आदी निकषावर नियुक्ती केली जाते.
कायदेशीर अधिकार : विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना काही प्रमाणात कायदेशीर अधिकार असतात. ज्यामुळे ते काही विशिष्ट परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी करू शकतात.
समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे कार्यकारी अधिकारी पोलिसांना मदत करतात.
अधिकारपत्र देणे : विविध प्रकारची अधिकारपत्रे देण्याचा अधिकार त्यांना असतो.
वाद मिटवणे : दोन व्यक्तींमधील किंवा गटांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करणे.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन : नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत आणि बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेणे.
समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी महत्वाचे योगदान देतात.
हे अधिकारी शासकीय आणि अशासकीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे काम करतात.
सामान्य लोकांना शासकीय योजना आणि कार्यक्रमांची माहिती देतात.
झेरॉक्स प्रतिवर सत्यप्रत म्हणून सही शिक्का देणे
-------------------------------
या पदावर नानीबाई चिखलीतील विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून भारत साठे , सौ शोभा चौगुले , बशीर नदाफ , बाळासो घस्ती यांची नियुक्ती झाली आहे .
नियुक्ती पत्राचे वाटप वाटप बिद्री कारखाना माजी संचालक प्रविणदादा भोसले व संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य सदाशिव तुकान , सरपंच युवराज कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तलाठी बी एस पाटील व ग्राम पंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले , पोलीस पाटील अमृता कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते .
-----------------------------

