सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांनी सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील योगदान सुरू ठेवावे - नामदार हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

 


                       



  

                       कोल्हापूर न्यूज नेटवर्क



सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांनी सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील योगदान सुरू ठेवावे  असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. 



केदार मल्टीपर्पज हॉल येथे मळगे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक ए. एम. पाटील यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव अस्वले होते.



 नामदार मुश्रीफ म्हणाले , प्राथमिक शाळेतील पटसंख्या घटत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण होत आहे. गणित, विज्ञान,आणि इंग्रजी विषय प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा पाया आहे. या विषयाकडे शिक्षकांनी लक्ष केंद्रित करून अध्यापन करावे.  आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीत नवीन आव्हानांचा स्वीकार करून शिक्षकांनी मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.



सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक ए. एम.  पाटील यांचा नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सहपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादा लाड, सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. जी. बी. कमळकर, राजेखान जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.



यावेळी के. डी. सी. सी.बॅक संचालक भैया माने, गोकुळ संचालक युवराज पाटील, मुख्याध्यापक व्ही जी.पोवार, रंजना अस्वले, मालुताई पाटील, निवृती परबकर, देवानंद पाटील, पै.रविंद्र पाटील, रणजित मुडूकशिवाले, बी.ए.तळेकर, रघुनाथ अस्वले, ए. एच. सय्यद, बी.एस.खामकर आदी उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक यांनी एस. जी. गोल्हार केले . आभार एस. के.फराकटे यांनी मानले.


             -----------------------------------