कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील एम जे इंटर नॅशनल स्कूल ने बहुचर्चित 'रामायण ' चित्रपट विदयार्थी व त्यांचे पालक यांना मोफत दाखविण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे.
येथील जयहिंद चित्रपटगृहात बुधवार 25 नोव्हेंबर रोजी 12 ते 3 या वेळेत दाखविण्यात येणार आहे.भारतीय संस्कृतीचे मानदंड असलेले रामायण व महाभारत हे ग्रंथ जगभरात लोकप्रिय ठरलेले आहेत. वाल्मिकी रामायणावर आधारीत 'रामायण ' हा चित्रपट जगभर प्रदर्शीत झाला आहे. मुलांना आदर्श कौटुंबिक संस्कारांचा परिचय व्हावा हा मुख्य उद्देश आहे. सद्या रामायण चा भाग 1 सुरू आहे. भाग 2 सुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
मोबाईल मध्ये गुरफटलेल्या शालेय मुलांना कुटुंब आणि समाज याविषयीच्या आवश्यक कर्तव्यांची जाणीव व्हावी. सत्य / असत्य, इष्ट /अनिष्ट, सदाचार /दुराचार याविषयिंचे भान असावे हे या चित्रपटातून समजू शकेल.
रामकथा ऐकण्यासाठी भक्त हनुमानजी अदृष्ट रूपाने उपस्थित असतात अशी श्रद्धा असल्याने त्यांच्या साठी एक आसन पुषहारासह रिक्त ठेवण्यात येईल असेही व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. हा चित्रपट पाहण्यासाठी पालक सुद्धा यावेत असे आवाहन संस्थेचे चेअरमन जावेद मकानदार यांनी केले आहे.
-------------------------

