कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मनपा श्री ज्योतिर्लिंग विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत विवान आबणे ( 264), वरद पाटील (250) व चिन्मय दांगट (248 ) या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. शाळेचा निकाल 100% लागला आहे .
या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती वैशाली राजकुमार गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशासनाधिकारी सौ जयश्री जाधव, पर्यवेक्षक विजय माळी , बाळासाहेब कांबळे, मुख्याध्यापक विजय बजरंग माळी ज्येष्ठ शिक्षक उमेश देसाई , के. बी. पाटील , सौ प्रतिभा कांबळे ,निर्मला कोळेकर, स्वाती मोहिते, सविता कुलगुडे ,संदीप शिसोदे व शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांचे सहकार्य लाभले.
-------------------------------

