आदमापूरच्या ऋतुजा पाटीलची समाजसेवा अधीक्षक राजपत्रित अधिकारीपदी निवड.

Kolhapur news
By -

 


                    


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क




 वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन DMER च्या समाजसेवा अधीक्षक, राजपत्रित अधिकारी वर्ग-3 या प्रतिष्ठेच्या पदावर भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील ऋतुजा बाळासो पाटील हिची निवड झाली आहे. 


   2025 मध्ये घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती  परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये तिने हे यश मिळवले. मेहनत, कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर ऋतुजाने मिळवले हे यश अभिमानास्पद आहे.


   ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण आदमापूर येथील वि. म. आदमापूर तर माध्यमिक शिक्षण प. बा. पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुदाळ येथे झाले. त्यानंतर तिने एम. एस. डब्ल्यू. ची पदवी कोल्हापूर येथील सायबर कॉलेजमधून घेतली.


   ऋतुजाचे वडील बाळासो पाटील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी मिळेल ते काम करून कुटुंबाला आधार दिला. चुलते दिलीप पाटील हे बाळूमामा देवालयाचे विश्वस्त आहेत. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऋतुजाने हे यश मिळवले आहे.


ऋतुजाच्या या यशाबद्दल गावातील नागरिक, शिक्षक, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे आदमापूर व परिसरातील मुलींना प्रेरणा मिळाली आहे.



                ऋतुजा बाळासो पाटील

                     

                 -----------------------------