कोल्हापूर न्यूज नेटवर्क
प्राजक्ता : समिर दादा, कायरे हे काय चाललंय तुझं?
समीर : प्राजु कशाबद्दल विचारतेस तू?
प्राजु ::, अरे राम रक्षा नावाचे आंदोलन का काय ते तू सुरु करणार आहेस म्हणे.!
समिर :ते होय.! अगं, केवढी मोठी चोरी झालीय रामा च्या दानपेटीत.
प्राजु :वा दादा वा. अरे पण चोरी तिकडे अयोध्येत झाली आहे? इकडे महाराष्ट्रात त्याचा काय संबंध?
समिर : तोच पैसा आणून आमचे खासदार, आमदार फोडत आहेत हे कमळ वाले.परवा अहिर काकांना पण त्यांनी नेलं.
प्राजु : होय, माहित झालंय मला.तो तर मुंबईचा अभिषेक बॅनर्जी होता म्हणे.
समिर : राणेनींच म्हटलंय तसं. आमचा बॅनर्जी घेऊन गेले हे खरं आहे.
गौरव : अगदी बरोबर. त्या बॅनर्जीच्या फोटोला कालच चपलां चा हार घालून आलो.
प्राजु :यें गौरव यें. कोठे घातलास चप्लांचा हार?
गौरव : लांब तिकडे कोल्हापुरात.
प्राजु : तिकडे कोठे? इकडे मुंबई तो हार घालायचा ना!
गौरव : वा ताई वा. म्हणजे मला इथे बांदऱ्या तच चपलाने ठोकतील. अहिर म्हणजे काय छोटा वाटला काय? खरा वाघ तोच. बाकीची नुसती मांजरं.
समिर : गौऱ्या, उचल ती तलवार. चल माझ्या बरोबर. राम रक्षा आंदोलन करायचं आहे.
गौरव.: नक्की च.( तलवार उचलतो ). दादा ही तलवार लाकडाची दिसती एकदम हलकी. विराट कोहली बॅट ह्येच्या लयी भारी.
समिर :गौऱ्या, बस्स झालं तुझं. आता माझं ऐकायचं. औरंगाबाद ला जायचंय. आटपून यें.
गौरव : तिकडं कशाला?
समिर :शपथ घ्यायला. तिथं जवळच औरंगजेब ची कबर आहे. तिथं राम रक्षा आंदोलनाची शपथ घ्यायची. आपलं ते प्रेरणा स्थान आहे.
शिवाली : मी पण येणार आंदोलन करायला.आम्हीं सगळ्या मिळून लाटणी मोर्चाच काढणार.
समिर : शाब्बास, गौऱ्या च्या तलवारी पेक्षा तुझं लाटणं लई भारी.
प्राजु :ऑपेरेशन सिंदूर पेक्षा ऑपेरेशन टायगर लई भारी झालं म्हणं.
समिर :छे गं. कुणी सांगितलं तुला. ते ऑपेरेशन फडणीस होतं. देवेंद्र चे पंख छाटणे सुरु झालंय.
शिवाली : त्येला पंख कुठं हाईत तवा. जॅकीट असतंय कायम. ते कसं छाटणार ?
समिर : तेच ते.त्याच जॅकीट च काढून घेतो.
गौरव :दिल्लीत जॅकीटे वाटायचं चालू हाय. मला एखाद दुसरं मिळालं तर मी बी जाणार.
समिर : जा जा तुही जा. ते गेले पेंग्विन साले.मी एकटाच जाईन. रामाचे रक्षण करीन.
------------------------------

